उपास करताना या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर आरोग्यविषयक या समस्या मागे लागतील.. – ONLINE MARATHI
Home / HEALTH / उपास करताना या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर आरोग्यविषयक या समस्या मागे लागतील..

उपास करताना या गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर आरोग्यविषयक या समस्या मागे लागतील..

श्रावण महिना सुरु आहे अनेक जणांचे उपवास सुरु असतील. काहीजण बारामहिने एखाद्या वारी उपास करतात. आपल्याकडे बहुतेकजण  एकादशी दुप्पट खाशी या प्रमाणे उपासाच्या दिवशी अगदी दुपट्ट खातात आणि आरोग्यविषयक वेगवेगळ्या समस्या मागे लावून घेतात. आरोग्यविषयक समस्या मागे लागू नये या करत उपास कसा करावा याबाबत आपण माहिती घेऊ.

आजारी व्यक्ती, मधुमेह असलेल्या व्यक्ती  गरोदर स्त्रिया, लहान मुले किंवा अशक्त व्यक्ती यांनी शक्यतो  उपास करणे टाळावे. किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपवास करावे.

१. तुमच्यासाठी  उपासाचा मूळ उद्देश हे व्रतवैकल्य किंवा भक्ती असा असला  तरी या उपासामुळे आरोग्यग्यविषयक समस्या निर्माण होणार नाही तसेच  पचनसंस्थेला आराम, शरीरशुद्धी असे फायदे होतील असा प्रयत्न करावा

Image-Readers chowk

२. कडकडीत उपास करू नये त्यामुळे पित्त  होण्याची शक्यता असते. तसेच शरीरातील पाणी कमी होण्याची शक्यता असते.

३. उपासाच्या आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी उपास आहे म्हणून भरमसाठ खाऊ नये किंवा खूप कमी देखील खाऊ नये समतोल हलका आहार घ्यावा.

४. उपासाच्या दिवशी आपण नेमके पचायला जड असणारे अन्नच घेतो असे न करता पचायला हलका असा आहार घ्यावा. नाहीतर पोटच्या आणि पित्ताच्या समस्या निर्माण होतील

५. साबुदाणा वडा,खिचडी , बटाट्याचे वेफर्स असे वातूळ आणि पित्त  वाढवणारे पदार्थ पदार्थ टाळावे. त्या ऐवजी राजगिरा पीठ, लाह्या, शिंगाड्याचं पिठ, वरई तांदूळ(भगर ) रताळं किंवा रताळ्याचे पीठ असे पदार्थ थोडे-थोडे खावेत.

Image-Recipe Notebook

६.काकडी, लाल भोपळा,ताजं दही ताक  फळं आणि सुकामेवा हे योग्य योग्य प्रमाणात खावेत. आहारातील द्रवपदार्थांचे प्रमाण वाढवावे. यासाठी पुरेसे पाणी, नारळपाणी, लिंबूपाणी, कोकम सरबत याचे सेवन करावे. यामुळे शरीरात ऊर्जा कायम राहत

Image-hindi boldsky

७.  या दिवशी खाण्याबरोबरच व्यायामाच्या बाबतीतही विशेष काळजी घ्या. जास्त व्यायाम करू नका किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करा. अति श्रमाची कामे टाळा. 

८. अनेक जण उपास सोडताना एवढे पदार्थ तयार करतात आणि दोन्ही वेळचे एकाच वेळी जेवतात असे करू नये अश्याने दिवसभर केलेल्या उपासाचं उपयोग होत नाही. तसचे पित्त उसळण्याची शक्यता असते.  

Image-Deskgram

९. उपवास सोडतानाही मुगाचे वरण -भात कमी मसालेदार भाजी कोशिंबीर असा पचण्यास हलका आहार घ्यावा.

१०. विविध धर्मांत उपास ही संकल्पना आरोग्याच्या दृष्टीने पचन संस्थेच्या दृष्टीने केली असावी असे वाटते. पण आपण आपल्या जिभेच्या चोचल्यांनी मूळ उद्देशच हरवून गेला आहे असे वाटते.

चुकीच्या पद्धतीने उपास केल्याने  गॅसेस, पित्त  अशक्तपणा अश्या समस्या मागे लागतात.

Featured image-Daily hunt

About K.K

Check Also

भारतातील सर्वात आयएएस आणि आयपीएस अधिकारी या गावामधून होतात

भारतातील सर्वात आयएएस आणि आयपीएस अधिकारी या गावामधून होतात जगाभरा मध्ये अनेकविविध संस्कृती,परंपरा,ज्ञान आणि धर्मनिरपेक्षता …

या कारणामुळे महिला,परपुरुषाला पसंद करू लागतात

या कारणामुळे महिला,परपुरुषाला पसंद करू लागतात हे बर्याचदा पाहिले गेले आहे की दीर्घ काळापासून नातेसंबंध …

ही आहे देशातील सर्वात दबंग आईपीएस,केवळ गुन्हेगारच नाही तर नेते सुद्धा घाबरतात

ही आहे देशातील सर्वात दबंग आईपीएस,केवळ गुन्हेगारच नाही तर नेते सुद्धा घाबरतात देशात जेव्हा ती …

आश्चर्यकारक आहे इथला वधू बाजार-पैसे देऊन खरेदी केली जाते मनपसंद वधू

आश्चर्यकारक आहे इथला वधू बाजार-पैसे देऊन खरेदी केली जाते मनपसंद वधू मित्रांनो,आपल्या भारत देशात लग्न …

खिलेश यादव यांची सुंदर पत्नी मंगळसूत्र परिधान का करत नाही,कारण ऐकून तुम्हाला आनंद होईल

खिलेश यादव यांची सुंदर पत्नी मंगळसूत्र परिधान का करत नाही,कारण ऐकून तुम्हाला आनंद होईल नमस्कार …

भाजपामध्ये एवढी सुंदर मुस्लिम युवती कोण आहे,योगींनी दिली आहे जबाबदारी

भाजपामध्ये एवढी सुंदर मुस्लिम युवती कोण आहे,योगींनी दिली आहे जबाबदारी तसे बघायला गेलं तर भारतीय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *