अटल बिहारी वाजपेयी यांनी पतंप्रधान असताना घेतलेले काही महत्वपूर्ण निर्णय आणि घटना - ONLINE MARATHI
Home / Inspiration / अटल बिहारी वाजपेयी यांनी पतंप्रधान असताना घेतलेले काही महत्वपूर्ण निर्णय आणि घटना

अटल बिहारी वाजपेयी यांनी पतंप्रधान असताना घेतलेले काही महत्वपूर्ण निर्णय आणि घटना

कविमनाचे साहित्यिक, अजातशत्रू राजकारणी, मुत्सद्दी नेता अशी ओळख असलेले अटल बिहारी वाजपेयी आता आपल्यात नसले तरी ते प्रत्येक भारतीयच्या मनात एक उत्तम राजकारणी आणि नेता  तसेच कवी म्हणून कायम राहतील.

अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मुत्सद्दीपणे घेतलेले निर्णय आणि त्या काळात घडलेल्या काही घटनांना ते कसे मोठ्या ध्येर्याने सामोरे गेले याबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत.

अणुचाचणी पोखरण २

Image-ajtak.intoday.com

११ मे १९९८मध्ये वाजपेयी सरकारने अणुचाचण्या केल्या. या चाचण्या जगाला, खास करून अमेरिकेला हादरवणाऱ्या ठरल्या, कारण भारताने अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहाला चुकवून त्या पार पाडल्या होत्या. तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या अणू चाचणीच हा निर्णय खूप धाडसी आणि जगाला आम्ही देखील कमी नाही हे सांगणारा होता.

शांततेसाठी पुढाकार

Image- Qura

वाजपेयींनी पाकिस्तान सोबत शांतता चर्चेसाठी मोठा पुढाकार घेतला. त्यांनी लाहोर-दिल्ली दरम्यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ते स्वतः पहिल्या बसमधून पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी गेले. यावेळी वाजपेयीं सोबत पाकिस्तानला केवळ राजकारणीच नव्हे तर कला क्षेत्रातूनही अनेक मान्यवर गेले. देव आनंद,जावेद अख्तर यांचाही त्यात समावेश होता.

कारगील युद्ध.

Image-zee News

१९९९ च्या प्रारंभी पाकिस्तानने आपले सैनिक आणि अधिकारी दहशतवाद्यांच्या वेशात भारतीय रिकाम्या चौक्यांवर घुसवले. त्यांतल्या कित्येक सैनिकांकडे व अधिकाऱ्यांजवळ त्यांची पाकिस्तानी ओळखपत्रेही होती. तसेच सोबतीला काही भाडोत्री दहशतवादीही होते. वाजेपयींना याविषयी समजताच त्यांनी भारतीय लष्कराला घुसखोरांना हुसकावून लावण्याचे आदेश दिले.१९९९ सालच्या मे ते जुलै दरम्यान हे युद्ध लढले गेले  आणि या युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना घालवून लावत आपला भूभाग परत मिळवला.

भारतीय प्रवासी विमानाचे अपहरण

Image-wiki

सन १९९९ साली तालीबान अतिरेक्यांनी IC – ८१४ या प्रवासी विमानाचे अपहरण केले . हे विमान नेपाळची राजधानी काठमांडूकडून दिल्लीला निघाले होते. अतिरेक्यांच्या या कृतीमुळे वाजपेयी सरकारने ३ अतिरेक्यांच्या बदल्यात प्रवासी विमानाची सुटका केली .

आर्थिक धोरणं

Image-Universe of Thoughts

वाजपेयीचे सरकार असताना देशाची अर्थव्यवस्था उत्तम होती. जीडीपीचा दर हा आठ टक्क्यांच्या पुढे होता तर महागाई दर चार टक्क्यांपेक्षा कमी होता. भारताकडे परकीय चलन साठाही चांगल्या प्रमाणात होता.

२००१ संसदेवरचा हल्ला

२००१ साली दहशतवादी अफझल गुरू आणि त्याच्या साथीदारांनी संसदेवर हल्ला केला . या हल्ल्यामध्ये ७ भारतीय सुरक्षा रक्षक मारले गेले.

featured Image-Jansatta

About K.K

Check Also

तुम्हाला माहीत आहे का की ब्राम्हण कांदा-लसूण का खात नाहीत ?

भारत हा एक अशा प्रकारचा देश आहे जिथे अनेक धर्म आणि त्यांच्या संस्कृती आहेत. यातीलच …

जाणून घ्या, 70 लाखाचे जोडे घालणारा रणवीर सिंग, इतक्या करोड संपत्तीचा मालक आहे.

जाणून घ्या, 70 लाखाचे जोडे घालणारा रणवीर सिंग, इतक्या करोड संपत्तीचा मालक आहे.   बॉलीवूडमध्ये …

काहीही बोलण्याआधी जाणून घ्या कोण आहे ही व्यक्ती, सत्य जाणून थक्क व्हाल.

काहीही बोलण्याआधी जाणून घ्या कोण आहे ही व्यक्ती, सत्य जाणून थक्क व्हाल.   मित्रांनो आपल्याला …

चुकून पण ह्या 4 गोष्टी गूगल वर सर्च करू नका, नाही तर घरातून उचलून नेतील पोलीस.

चुकून पण ह्या 4 गोष्टी गूगल वर सर्च करू नका, नाही तर घरातून उचलून नेतील …

गुजरात दंगल वेळी ज्या 2 व्यक्तीचे फोटो वायरल झाले होते,ते दोघे आता हे काम करत आहेत

2002 ला गुजरात मध्ये झालेल्या दंगलीने संपूर्ण देशाला हादवरून सोडलं होत. ह्या दंगलीतील 2 फोटो …

विदेशी साध्वीला झाले 70 वर्षीय भारतीय साधू सोबत प्रेम,विवाहासाठी गेले कोर्टात,वाचा संपूर्ण काय प्रकरण आहे ते

असे म्हटले जाते की प्रेम कोणावरही होऊ शकत आणि आयुष्यात कधीही होऊ शकत.अध्यात्मिक प्रेमाच्या मार्गावर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *