अशा काही बॉलीवूडच्या ख्यातनाम व्यक्ती, ज्यांच्या बाळांची नावे असामान्य आहेत! - ONLINE MARATHI
Home / HEALTH / अशा काही बॉलीवूडच्या ख्यातनाम व्यक्ती, ज्यांच्या बाळांची नावे असामान्य आहेत!

अशा काही बॉलीवूडच्या ख्यातनाम व्यक्ती, ज्यांच्या बाळांची नावे असामान्य आहेत!

कोणत्या सुप्रसिद्ध व्यक्तींनी त्यांच्या बाळाचे नामकरण काय केले, याची आपण आतुरतेने वाट पाहत असतोच; हे उघड गुपित आहे! आणि जेव्हा ते नामकरण करतात; तेव्हा जवळपास आपल्या सर्वांची हीच प्रतिक्रिया असते- ‘हे माझ्या का बरे ध्यानात आले नाही?’ किंवा ‘हे नाव कधी ऐकण्यातच झाले नाही!’ या प्रसिद्ध बाळांच्या विलक्षण, तरीही सुंदर असणाऱ्या नावांवर आपली नजर फिरवा; ज्यांचा तुम्ही देखील वापर करू शकता.

१. तैमूर

आजकाल सर्वत्र प्रसिद्ध झालेल्या नावापासूनच सुरुवात करुयात, बरोबर ना? एक राजेशाही दांपत्य असलेल्या करिना कपूर-खान आणि सैफ अली खान यांनी त्यांच्या गोंडस बाळाचे नाव ‘तैमूर अली खान’ असे ठेवले; जे ‘तिमूर’ या नावाचेच एक रूप आहे. तिमूर हा एक तुर्की मंगोल सम्राट होता. तसेच अरबी भाषेत तैमूर चा अर्थ ‘लोह’ असा आहे.

२. अब्राम

शाहरुख खान आणि गौरी खानच्या तिसऱ्या अपत्याचे नाव ‘अब्राम’ असे आहे. हे एक अतिशय नाविन्यपूर्ण नाव तर आहेच; शिवाय यामागचे कारण ऐकून तुम्ही या नावाच्या अजून प्रेमात पडाल! हे नाव प्रेषित अब्राहमचे एक रूप आहेच; तसेच या नावामध्ये अजून एक धार्मिक छटा आहे; कारण याचा शेवट ‘राम’ ने होतो.

३.  ह्रिधान आणि ह्रेहान

ह्रिधान म्हणजे मोठ्या मनाची व्यक्ती; तर ह्रेहान हे ‘रेहान’ या शब्दात बदल करून निर्माण केलेले नाव आहे; ज्याचा अर्थ आहे- परमेश्वराकडून निवडली गेलेली एक व्यक्ती. ही विलक्षण आणि तरीही अर्थपूर्ण नावे आहेत, नाही का? या दोन मुलांनी ऋतिक रोशन आणि सुझान खानची आयुष्ये आनंद आणि उत्साहाने भारून टाकलेली आहेत.

४. आदिरा

रानी मुखर्जी आणि आदित्य चोप्राने त्यांच्या प्रेमळ मुलीचे नाव ‘आदिरा’ ठेवले आहे. त्यांच्या दोघांच्याही नावांना जोडून हे नाव तयार झाले आहे- आदित्य मधील आदि आणि राणी मधील रा. हे विलक्षण चातुर्य आहे, नाही का? तुमचे आणि तुमच्या पतीचे नाव जोडून कोणते नाव तयार होईल बरे? आम्हाला खाली कमेंट्समध्ये कळवा.

५. झार

‘झार’ चा लॅटिनमध्ये अर्थ सम्राट असा होतो. आणि तो फराह खानने 2008 मध्ये जन्म दिलेल्या तिळ्यांमधील एक मुलगा आहे. त्याच्या बहिणींची नावे ‘डिव्हा’ (लॅटिनमध्ये दैवी) आणि ‘आन्या’ (रशियन मध्ये डौलदारपणा) असा होतो.

६. शाहरान आणि इक्रा

जेव्हा सर्वजण ग्रीक आणि लॅटीन पासून प्रेरणा घेत होते; तेव्हा संजय दत्त आणि मान्यता यांचा पर्शियन आणि हिब्रू नावांकडे जास्त ओढा होता. म्हणूनच त्यांनी त्यांच्या जुळ्यांची नावे शाहरान (शाही सरदार) आणि इक्रा (शिक्षण देणे) अशी ठेवली आहेत.

७.  व्हीआन

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी ‘आनंदाचे कोठार’ हा वाक्प्रचार अक्षरशः मनावर घेतलेला दिसतो. त्यांच्या मुलाच्या नावाचा (व्हीआन) अर्थ हा ‘चैतन्य आणि शक्तीने ओतप्रोत भरलेली व्यक्ती’ असा होतो.

८.  निसा

अजय देवगन आणि काजोलच्या पहिल्या बाळाचे नाव निसा आहे; ज्याचा ग्रीकमध्ये अर्थ ‘नवीन सुरुवात किंवा आकांक्षा’ असा होतो. तिचा भाऊ युग आहे; ज्याचे नाव एक नवीन काळ अधोरेखित करतो. ही नावे एकाच वेळी किंचितशी शाही, नाविन्यपूर्ण आणि शक्तिवान आहेत.

९. इमारा

इमरान खान आणि अवंतिका मलिक या देखण्या तरुण जोडीने त्यांच्या बाळाचे नाव ‘इमारा’ ठेवले आहे. त्याचा स्वाहिली मध्ये अर्थ ‘मजबूत आणि अढळ’ असा होतो. तिचे पूर्ण नाव इमारा मलिक खान आहे; म्हणजे तिच्या नावात तिच्या दोन्ही पालकांची आडनावे समाविष्ट होतात.

१०.  रायन

रायन हा माधुरी दीक्षित आणि आणि श्रीराम नेने यांचा मुलगा असून, त्याचा अरेबिकमध्ये अर्थ हा ‘स्वर्गाचे दार उघडणारा’ असा होतो. तसेच संस्कृतमध्ये त्याचा अर्थ ‘राजकुमार’ होतो आणि ज्युईश मध्ये ‘राजबिंडा’ असा होतो. यापेक्षा वैविध्यपूर्ण नाव तुम्ही शोधू शकता का?

About admin

Check Also

लसूण खाणार्यांनी व्हा आता सावध,आजच वाचा ही पूर्ण बातमी.नाहीतर?

लसूण एक अशी खाद्य सामग्री आहे जी प्रत्येक स्वयंपाक घरात मिळून येते. लसूणचा उपयोग जेवणाचा …

सीताफळ खाल्ल्याने होतात हे आजार कायमचे बरे,लवकर वाचा..

सीताफळ चवीला गोड असतं. सीताफळ खाण्याचे फायदे माहिती असले, नसले तरी आपण ते खाण पसंद …

दररोज हिरवी मिरची खाल तर,नष्ट होतील हे 6 रोग.

तिखट खाणं आरोग्यासाठी चांगल होऊ शकत पण तेव्हा, जेव्हा आपण यासोबत हिरव्या मिरचीचे सेवन करता. …

आपणही बोकडाचे पाय खात असाल तर ही पोस्ट नक्की वाचा.

आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, बोकडाच्या पायाचे मास आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असत. पण तुम्हाला …

जर आपणही चिकनची चरबी खात असाल तर ही गोष्ट नक्की जाणून घ्या,नाहीतर हा गंभीर आजार होईल..

चिकन खाणाऱ्या बहुतांश लोकांना माहीत नसतं की, चिकनची चरबी खाल्ली पाहिजे की नाही ? ते …

जर लघवी केल्यानंतर थेंब गळत असतील तर,आपल्याला असू शकतो हा गंभीर आजार

लघवी करणे ही एक शारीरिक प्रक्रिया आहे, जी प्रत्येक मनुष्य आणि प्राणी करतो. पण लघवी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *