झुरळांचा नायनाट करण्यासाठी त्यानं घर पेटवलं – ONLINE MARATHI
Home / Uncategorized / झुरळांचा नायनाट करण्यासाठी त्यानं घर पेटवलं

झुरळांचा नायनाट करण्यासाठी त्यानं घर पेटवलं

घरात झुरळे असली तर ते कुणालाच आवडत नाही. पण या नावडत्या कीटकांना घरातून हद्दपार कसे करावयाचे, हे मात्र न सुटणारे कोडे असते. त्यांना मारण्यासाठी चपलेपासून अत्यंत महागडय़ा कीटकनाशकांपर्यंतचे उपाय योजले जातात. त्यांना दूर ठेवण्यासाठी लक्ष्मण रेषा मारल्या जातात. तरीही या कोणत्याच उपायांना दाद न देणारी ही अत्यंत कोडगी अशी जात आहे. आपल्याकडे दोन प्रकारची झुरळे मोठय़ा प्रमाणावर आढळतात. १ ते १.५ लांबीची व काळ्या किंवा लाल रंगाची अमेरिकन झुरळे (पेरिप्लानेटा अमेरिकना) शहरात विशेषत: जमिनीखाली असलेल्या गटारांमधून वस्तीला असतात. घरात दिवसा अंधाऱ्या जागेत ही मंडळी दडून बसतात. लाकडी दिवाणांच्या फटीत, बाथरूम किंवा शौचालयांमध्ये व माणसांचा फारसा वावर नसलेल्या खोल्यांमध्ये यांचा वंश विस्तार वाढत असतो. रात्र झाली की यांचा दिवस सुरू होतो. मध्यरात्री विशेषत: स्वयंपाकघरात यांचा मुक्त संचार आढळून येतो. रात्री क्वचित कधीतरी पालीची व एखाद्या झुरळाची लढाई देखील पाहायला मिळते. पालींना झुरळांचे खाद्य अतिशय आवडते. या अमेरिकन झुरळांपेक्षा लहान असणारी झुरळांची दुसरी जात म्हणजे जर्मन झुरळे! ब्लाटेला जर्मेनिका हे वैज्ञानिक नाव असलेली ही झुरळे साधारणपणे अध्र्या इंचापेक्षाही कमी लांबी असलेली. दाराच्या फटींमध्ये किंवा स्वयंपाकघरातील मांडण्यांमध्ये, टीव्हीच्या मागच्या बाजूला असलेल्या फटींमध्ये, लोखंडी किंवा लाकडी कपाटांमध्ये आपला संसार थाटून वावरत असतात. यांचा समूळ नायनाट करणे प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असते, पण बऱ्याच वेळी ते स्वप्न खरे होत नाही. याशिवाय एशियन झुरळेदेखील आपल्याकडे सापडतात. यांचे वैज्ञानिक नाव ब्लाटेला आशियाना असे आहे. या सर्व प्रकारच्या झुरळांना उष्ण व दमट वातावरण पोषक असते. त्यामुळेच ते स्वयंपाक घरात किंवा बाथरूममध्ये हमखास दिसतात. विशेषत: अमेरिकन जातीची झुरळे पंखाची असतात व ती थोडे अंतर उडू शकतात. यातील काही जातींची झुरळे अन्न-पाण्यावाचून महिनोन्महिने राहू शकतात. त्यामुळेच झुरळाचा नायनाट करणे अतिशय अवघड असे प्रकरण आहे.

 

झुरळ’ म्हणजे आपल्यासाठी त्यातून महिलावर्गांसाठी किती तिरस्काराचा विषय हे वेगळं सांगायला नको. त्यामुळे या झुरळांचा नायनाट करण्यासाठी कितीही उर्जा खर्ची पडली तरी बेहत्तर असा विचार समस्त महिलावर्ग करत असतील तर आश्चर्य वाटायला नको. किचनमध्ये झुरळ दिसलं आणि बायको किंवा घरातली महिला ओरडत आली तर त्या झुरळाच्या मिश्या पकडून त्याला तिच्यासमोर नाचवण्यात काहींना जो असुरी आनंद मिळतो ते वेगळं सांगायला नको. या झुरळांना पळवून लावणं एखादीसाठी कठीण काम असलं तरी पायांच्या अंगठ्यानं झुरळाला चिरडण्याएवढं सोप्पं काम पुरुषासाठी नसेल. तर, हा झाला गंमतीचा भाग पण ऑस्ट्रेलियामधील माऊंट इसामध्ये  राहणाऱ्या एका व्यक्तीनं झुरळांचा नायनाट करण्यासाठी आपलं अर्ध घरच पेटवल्याचा हास्यास्पद प्रकार समोर आला आहे.

एबीसी न्यूजच्या हवाल्यानुसार हा व्यक्ती झुरळ्यांच्या उपद्रवाला कंटाळला होता, तेव्हा त्यांनं झुरळांना मारण्यासाठी  स्प्रेचा वापर केला. हा स्प्रे ज्वालाग्रही असल्याचं त्यावर लिहिलं असतानाही या व्यक्तीनं त्याचा वापर केला. त्यामुळे घराच्या किचनमध्ये स्फोट होऊन किचनकडील भाग पूर्णपणे जळला. यात तो गंभीर जखमीही झाला आहे. स्फोट झाल्याची बातमी कळताच पोलीस आणि अग्निशमन दलानं तातडीनं या परिसरात धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं यात घरातील इतर लोक मात्र बचावले आहेत.

About admin

Check Also

लग्नानंतर नवरा आणि बायकोला या ४ गोष्टी माहित असणे गरजेचे आहे

जेव्हा पण मिळेल एकांत तेव्हा नवरा-बायकोने ठेवले पाहिजे या गोष्टीचे ध्यान, त्यामुळे सुखी वैवाहिक जीवन …

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची गायब झालेली घोडी मिळाली फेसबुक द्वारे

पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची गायब झालेली घोडी मिळाली फेसबुक द्वारे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांची गायब झालेली घोडी मिळाली फेसबुक …

बातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल

बातम्या चालू असतात २ एंकर मध्ये live झाली हाणामारी विडीयो झालाय वाय्हरल बातम्या चालू असतात …

या नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल …

या नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी वोटर आईडी कार्डाचा वापर कसा केला असेल या नवीन लग्न …

काही हास्यास्पद प्रश्न जे सरकारी नोकरीच्या मुलाखती मध्ये विचारले जातात

म्हाला समजल्यावर आश्चर्य आणि राग सुध्दा येईल की IAS, PCS सारख्या मोठ्या सरकारी नोकरीच्या मुलाखती …

फेसबुक कधी काय व्हायरल होतील सांगता येत नाही आता तुम्ही हि १० फोटोस बघा :D

फेसबुक कधी काय व्हायरल होतील सांगता येत नाही आता तुम्ही हि १० फोटोस बघा फेसबुक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *