विरोधानंतर देखील पद्मावत ने तोडले सारे विक्रम?? आठवड्याचे कलेक्शन ऐकून तुम्ही चकित व्हाल! – ONLINE MARATHI
Home / HEALTH / विरोधानंतर देखील पद्मावत ने तोडले सारे विक्रम?? आठवड्याचे कलेक्शन ऐकून तुम्ही चकित व्हाल!

विरोधानंतर देखील पद्मावत ने तोडले सारे विक्रम?? आठवड्याचे कलेक्शन ऐकून तुम्ही चकित व्हाल!

विरोधानंतर देखील पद्मावत ने तोडले सारे विक्रम?? आठवड्याचे कलेक्शन ऐकून तुम्ही चकित व्हाल!

बॉलीवुड आणि विरोध हे एक आता नाते बनले आहे.सामान्य जीवनात जर एखादा व्यक्ती वादामुळे अडकला तर त्याची खूप बदनामी होते आणि लोक त्यापासून दूर होतात.पण बॉलीवुडबाबत हे उलट आहे.जर वादविवाद झाला तर अभिनेता किंवा अभिनेत्री यांची पब्लिसिटी झालीच म्हणून समजा.जास्तीतजास्त लोक त्यांच्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागतात.

बॉलीवुड ची नुकतीच रिलीज झालेली फिल्म पद्मावतच्या बाबतीत काही असेच झाले आहे. फिल्मच्या शूटिंग पासून रिलीजपर्यंत खूप सारे वाद निर्माण झाले. फिल्मचे निर्देशक संजय लीला भंसाळी हे फिल्मचे शूटिंग राजस्थान मध्ये करत असताना राजपूत संगठन करणी सेना यांनी या फिल्मच्या सेटची तोड़-फोड़ केली आणि संजय लीला भंसाळीला थप्पड पण लगावली होती.त्यानंतर याचे शूटिंग दुसरीकडे झाले.

सुरु झालेला हा वाद काही थांबण्याचे नाव काही घेत न्हवता.याचदरम्यान गुजरातची निवडणूक आली आणि याचा राजनैतिक वापर पण केला गेला. करणी सेना आणि काही बीजेपी नेत्यांनी म्हटले की या फिल्म मुळे इतिहासाची छेडछाड झाली.यामुळेच देशात सर्वत्र या फिल्मचा विरोध केला गेला.फिल्म चे नाव पद्मावती बदलून पद्मावत केले. सुप्रीम कोर्ट कडून परवानगी मिळाल्यावर फिल्म रिलीज झाली.

याच दरम्यान मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थानच्या सरकार ने फिल्म बॅन केली.त्यामुळे इथे फिल्म प्रदर्शित झाली नाही.आपल्याला जाणून आश्चर्य वाटेल की एवढ्या विवादानंतर फिल्म खूप रेकॉर्ड करत आहे.या फिल्म ने एका आठवड्यात देशात बॉक्स ऑफिसवर ११५ कोटी इतकी घसघशीत कमाई केली. ट्रेड एनालिस्ट रमेश बाळा यांच्यामते फिल्मने सुरवातीच्या आठवड्यात ६ दिवसांत १४३ कोटी इतकी कमाई केली आहे.


प्रोडक्शन कंपनी वायकॉम १८ यांच्या मते पहिल्या आठवड्यात १७६ कोटी इतकं ग्रॉस कलेक्शन पूर्ण देशात केले आहे.पूर्ण जगात याची कमाई २५३ कोटी इतकी आहे. फिल्म देशातल्या तीन राज्यांमध्ये गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान मध्ये बॅन होऊन सुद्धा जबरदस्त कमाई करत आहे. आपल्याला सांगतो की, पद्मावतने पेड प्रीव्यूमुळे ५ कोटी, , गुरुवारच्या दिवशी १९ कोटी ,शुक्रवारी २३ कोटी,शनिवारी २७ कोटी,रविवारी ३१ कोटी आणि सोमवारी १५ कोटी आणि मंगळवार या दिवशी १४ कोटी इतकी कमाई केली आहे. ‘पद्मावत’ ने रिलीज झाल्याच्या पहिल्या दिवशी १९ कोटी मिळवले. रणवीर ची मागील फिल्म ‘गुंडे’ ने पहिल्या दिवशी १६.१२ कोटी तर ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ ने १६ कोटी कमावले होते.

About admin

Check Also

हिंदू धर्मात प्रेताला जाळण्याची प्रथा का आहे ? जाणून या मागची वैज्ञानिक कारणे

मुळात आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे. मी जर या हिंदू धर्माला …

वेळेआधीच जीवनाचा प्रवास संपलेले हे १० बॉलिवूड कलाकार !

  तुम्ही तुटत्या ताऱ्याला पाहिलं असेल . आकाशात एक चमकणारी रेष येऊन जाते. जोपर्यंत आपण …

लग्नानंतर हनीमूनला जाण्याची हि आहेत ५ कारणे जाणून घ्या.

लग्नानंतर हनीमूनला जाणे का जरुरी आहे जाणून घ्या ! लग्न झाल्यानंर हनीमूनला जाण्याचा एक ट्रेंड …

मुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का ?

मुलीच्या व्हर्जिनिटीबद्दलचे हे गैरसमज तुम्हाला माहिती आहेत का. आजही लग्नापर्यंत मुलीचं व्हर्जिन असणं महत्वाचं मानलं …

लग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी !

लग्नाच्या एक तासापूर्वी प्रियकरासोबत अशा अवस्थेत होती नवरी ! येथील काहनी गावात लग्नाच्या एक तासापूर्वी …

आता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली!

आता राशीनुसार बघा तुमची गर्लफ्रेंड रागीट असेल किंवा शांत नेचर वाली! राशीच्या नुसार बघा गर्लफ्रेंडचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *